१६ जून २०२५ ला आदित्य ठाकरे व विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0


ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री मिळवणे अजूनही मोठे आव्हान ठरते. ही गरज ओळखून युवा सेना प्रमुख माननीय आमदार आदित्यजी ठाकरे व युवासेना कार्यकारी सदस्य व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त 16 जून 2025 रोजी विशेष शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये :
  • ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
  • मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम
  • विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन
  • भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प

कार्यक्रमाचे वेळापत्रक :
  • न्यू इंग्लिश स्कूल, तळवली - साकळी — सकाळी 11:00 वाजता
  • व्हीएन इंग्लिश स्कूल, पालपेणे — दुपारी 12:00 वाजता
  • DHV माध्यमिक शाळा व न्यू भारत उर्दू हायस्कूल, अंजनवेल — दुपारी 12:30 वाजता
  • न्यू इंग्लिश स्कूल, वेलदुर — दुपारी 1:30 वाजता

कार्यक्रमामागील प्रेरणा :

युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'शिक्षण हेच भविष्य' या तत्वज्ञानावर आधारित हे उपक्रम राबवले जात आहेत. विक्रांत जाधव यांच्या म्हणण्यानुसार, "शिक्षण हा मुलांचा खरा हक्क आहे. अशा उपक्रमांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची साधने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि भविष्यातही हे कार्य अधिक व्यापकपणे सुरू राहील.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top