अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आज पारंपरिक गोंधळ घालून शासनाला साकडे घातले. जिल्हा परिषदेसमोर झालेल्या आंदोलनात वाळवा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस यांनी आज सहभाग घेतला. गेल्या १८ दिवस जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.यामध्ये सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करणे, शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेनुसार सेवेत सामावून घेणे , शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन करणे,तसेच सहा महिन्यात महागाईच्या निर्देशांकानुसार वेतनवाढ वाढ करावी आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे आंदोलन सुरू आहे. रोज ह्या आंदोलनाला नवीन वळन येत आहे. आज त्यांनी देवीचा गोंधळ घालून शासनाकडे साकडे घालण्याचे आंदोलन करुन शासनाचे आंदोलनकडे लक्ष्य वेढण्याचा प्रयत्न केला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपले तरी आंदोलन सुरूच राहील तसेच, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येईल. त्या वेळी आंदोलनच्या पुढील मार्ग काढण्यात येतील असे अंगणवाडी कर्मचाऱ्यानी सांगितले आहे. . आजच्या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्षा अरुणा झगडे, जिल्हा कार्याध्यक्ष विजया जाधव, सचिव नादिरा नेदाफ, उपाध्यक्षा अलका विभूते, नीलप्रभा लोंढा, अलका माने यांच्यासह सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
Post a Comment
0 Comments* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.