![]() |
पेन्शन योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनात विशाल दादा पाटील सहभागी |
पेन्शन योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनात विशाल दादा पाटील सहभागी.
जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू केली जावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असणाऱ्या आंदोलनास विशाल दादा पाटील यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
सरकारी योजना गावागावात, प्रत्येक घरांपर्यंत पोहचवण्याची जवाबदारी शासकीय कर्मचारी पार पाडत असतात. इमानेइतबारे सेवाकरूनही त्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नाही व तो मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन दिली जाणे गरजेचे आहे.सरकार केवळ आज देतो, उद्या देतो अशी आश्वासने करत आहे .त्यामुळे सरकारने अशी आश्वासने न देता आणि कोणतेही राजकारण न करता सदर मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी विशाल दादा पाटील व उपस्थित आंदोलकांनी केली.