![]() |
आटपाडी बाजारपेठच्या रस्त्याची चाळण |
आटपाडी शहरातील बाजारपेठ ही तालुक्याची मुख्य व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठेतील रस्त्याच्या काम चालले आहे. आणि हा नेहमीच राजकारणाचा विषय बनला आहे.आत्ता रस्त्याला अखेर मुख्य पेठेतील एसटी बसस्थानक ते नगरपंचायतपर्यंत मंजूरी मिळाली आहे. या निधीमध्ये दोन्ही बाजूस बंदिस्त ड्रेनेज तसेच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन अशी विविध कामे होणार आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आटपाडी बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश बुर्ले यांची भेट घेतली तसेच पेठेतील व्यापारी आणि ठेकेदार यांची बैठक घेऊन रस्ताच्या कामाला लवकर सुरुवात करावी आणि व्यापारी व आटपाडीकर म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दरम्यान, अभियंता सतीश बुर्ले यांनी रस्त्याच्या कामाची माहिती दिली. तसेच ठेकेदार यांनी पेठेतील व्यापाऱ्यांचे सहकार्यांचे आवाहन केले होते.
त्या भागातील दुकानाचे मालक आणि व्यापारी त्यांनी रस्ताकामाला सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात येणार होती.तसेच २० ते २५ डिसेंबरपर्यंत रस्त्याच्या कामाकाजास सुरुवात करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु डिसेंबर महिना संपत आला तरी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने व्यापारी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.