आरग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मिरज मधील आरग येथे साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील असा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.यावेळी उपस्थित मराठा समाजातील लोकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या गेल्या.राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होतो,परंतु, राज्य सरकारने पुन्हा एकदा पुढील तारीख देऊन मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.