पलूस मध्ये मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. |
साहित्य संमेलनातून ग्रामीण साहित्यिकांना प्रेरणा आणि पाठबळ देण्याचे काम होते. ग्रामीण भागातले जे कवी, साहितीक आणि लेखक ते अस्सल सोने असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे (पुणे) यांनी पलूस मध्ये व्यक्त केले.
पलूस मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पलूस तसेच स्वामी विवेकानंद ग्रामविकास मंडळ, पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने ३४ वे मराठी साहित्य संमेलन पार पडले, त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, तसेच शिराळा तहसीलदार शामल खोत-पाटील, गणपतराव पुदाले, गटनेते सुहास पुदाले, नागपूर तहसीलदार प्रताप वाघमारे, असे विविध मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते.
संमेलनात बोलताना वानखेडे म्हणतात प्रत्येक कवी हा आई-वडिलांवर एकदा तरी कविता लिहित असतो. आई-वडिलांच्या वेदना तो कवी शब्दात मांडत असतो. आजच्या काळात पालक मुलाच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करत असतात. त्यांच्या त्या कष्टाचे मोल होणे गरजेचे आहे.
या संमेलनात साहितीक तहसीलदार प्रताप वाघमारे, प्रा. भीमराव धुळूबुळू,प्रा. बाळासाहेब लबडे, अशोक पवार, पोपट काळे,प्रा. बाळासाहेब लबडे, प्रा. भारत सातपुते, प्रतिभा जगदाळे आदी साहित्यकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. आणि उद्योगरत्न पुरस्काराने उद्योजिका दीपाली बाबासाहेब पवार यांना सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर दुपारच्या सत्रातमध्ये प्रदीप कांबळे (सातारा) यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कविसंमेलन पार झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पलूस शाखेचे कार्याध्यक्ष सुहास पुदाले,खजिनदार संदीप नाझरे, कार्यवाहक शरद जाधव, तसेच स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस,व कार्यकारिणी सदस्यांनी एकत्रित या संमेलनाचे संयोजन केले आहे.