![]() |
सांगली जिल्ह्यात ऊस दराचा तिढा अद्यापही सुटलेला नाही |
उर्वरित कारखान्यांचा निर्णय अजूनही प्रलंबित असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली (दि 26/12/2023 बुधवारीरोजी) सायंकाळी चार वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची बैठक होणार आहे.आज तरी तोडगा निघणार का नाही, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी १६ डिसेंबरला झालेल्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांना जिल्हाधिकारी यांनी निमंत्रण दिले होते. त्यावेळी आ. मानसिंगराव नाईक, शरद लाड, विशाल दादा पाटील वगळता कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीला किती अध्यक्ष उपस्थित राहतील, याबाबतही चर्चा सुरु आहे.