![]() |
पादचारी पुलाचे काम साताऱ्यात महिन्यात होऊ शकते मग सांगलीत का नाही. |
सांगली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म एक एकवरून प्लॅटफॉर्म चार ,पाच व मालधक्क्यावरील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पुल नाही त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते व त्यांना रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जावे लागते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मध्य रेल्वेचे मॅनेजर राम करण यादव हे दि 26/12/2023 रोजी पाहणी करता सांगली रेल्वे स्थानकावर आले होते पण पादचारी पुल नसल्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणे धोक्याचे आहे असे म्हणणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहणीसाठी रेल्वेरुळ ओलांडून जावे लागले.
मध्य रेल्वेचे अधिकारी सांगली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर येण्या-जाण्यासाठी पुल बांधत नसल्यामुळे प्रवासी, हमाल व पाहणीकरता आलेल्या अधिकाऱ्यांनाही रेल्वे रुळ ओलांडून जाव लागत आहे.जर पादचारी पुलाचे काम साताऱ्यात महिन्यात होऊ शकते मग सांगलीत का नाही असा प्रश्न नागरिक जागृती मंचला पडला आहे.