![]() |
सांगली: अंगणवाडी सेविकांच्या संपाला ,आशा गट प्रवर्तकांचा पाठिंबा. |
अंगणवाडी सेविकांच्या सुरु असलेल्या संपाला आशा गट प्रवर्तकांनी पाठिंबा दर्शवला तसेच संपास महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस सुमन पुजारी आणि अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुजारी यांनी पाठिंब्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
जोपर्यंत अंगणवाडी महिलांचा संप सुरू आहे, तोपर्यंत त्यांना पाठिंबा देऊ विधानआशा गट प्रवर्तकांच्या तर्फे करण्यात आले.संप फोडण्यासाठी म्हणून आशां वापर केला जात आहे असाआरोप आयटक संघटने करण्यात आला .संप फोडण्यासाठी म्हणून आशां वापर केला जाणार असल्यास त्याला त्या बळी पडणार नाही असा इशारा आशांच्या वतीने देण्यात आला.