![]() |
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अनिल बाबर |
केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमसभा घेण्यात येते. मात्र विधानसभा विसर्जित होण्याची वेळ आली तरीही खानापूर-आटपाडी मतदारसंघात आमसभा घेण्यात आली नाही.खानापूर-आटपाडी दोन-दोन आमदार असतानाही आमसभेचा प्रश्न मार्गी लागला नाही.
खानापूर-आटपाडी मतदारसंघात आमसभा होणार की नाही, असा प्रश्न जनते समोर पडला आहे. मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर व विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमसभा होत नाहीत, गतवेळच्या आमसभेतील निर्णयांची अंमलबजावणी किती झाली व अंमलबजावणी अद्याप न होण्याची कारणे ही याच आढाव्यातून समजते.त्यामुळे खानापूर-आटपाडी मतदारसंघातील गत सभेतील पाणी, वीज, रस्ते, इंदिरा आवास योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, पेयजल, जलस्वराज्य योजना, विहिरी, पायाला दलित वस्ती विकास, संजय गांधी योजना अशा अनेक योजना, त्याच बरोबर आणखी काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी आमसभा होणं हे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी आमसभा त्वरित घ्यावी,अशी मागणी खानापूर-आटपाडी मतदारसंघातील ग्रामस्थांनकडून होत आहे