महाविकास आघाडीला धक्काः श्रीगोंदा येथील दोन महत्त्वाच्या नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

0

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेले राहुल जगताप (शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अपक्ष) आणि अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून) यांनी अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तटकरे यांनी जून महिन्यात मोठ्या पक्षप्रवेशाचे संकेत देत, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करणाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या प्रवेशांमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top