![]() |
अजुन जनतेला पाणी मिळाले नाही तोवरच नेत्यांची भांडणे सुरू |
खानापूर मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्यात टेंभू योजनेसाठी सोशल वॉर सुरू केला आहे. यात खानापूर आटपाडी आणि तासगाव या तालुक्यातील ३६ गावाना याचा फायदा होणार आहे. तरी त्याचे श्रेय घेण्यासाठी महायुतीच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये लढाई सुरू झाली आहेत.
खानापूर, आटपाडी, आणि विसापूर सर्कलमधील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे पाणी देण्यासाठी तिसऱ्या सुप्रमाची किंमत ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपये होती, तरीही अनेक गावे वंचित राहत आहेत. त्यामुळे सुधारित ७ हजार ३७० कोटी रुपयांच्या तिसरा प्रस्ताव मंडण्यात आला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
परंतु, त्यापूर्वीच बुधवारी सर्वप्रथम भाजपचे खासदार संजय पाटील यांनी तिसऱ्या प्रस्तावयाच्या मंजुरीची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊ अशी वार्ता सोशल मीडियाला बुधवारी दिली. त्यानंतर लगेच दोन तासात शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट) आ. अनिल बाबर यांनीही याबाबतची अशीच माहिती दिली. त्यामुळे खा. संजयकाका पाटील व आ. अनिल बाबर यांच्यात श्रेयवदाची लढाई सुरू झाली आहे असे दिसत आहे.
तसेच सोशल मीडिया वर पोस्टर बाजी करत टेंभू योजनेला यश आल्याची माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही एकप्रकारे दावाच ठोकला आहे.