लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शेअर बाजाराने मंगळवारी पुन्हा विक्रमी उसळी घेतली. सेन्सेक्स ८०,८९८ अंकांपर्यंत तर निफ्टी २४,६६१ अंकांपर्यंत उसळला होता. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ५१ अंकांनी वाढून ८०,७१६ अंकांवर तर निफ्टी २६ अंकांनी वाढून २४,६१३ अंकांवर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १४ हजार कोटींची वाढ झाली.
सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १६ मध्ये वाढ झाली तर १४ समभाग घसरले. भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे शेअर्स वधारले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,८६५ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली तर या काळात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३३१ कोटीच्या शेअर्सची विक्री
ELORTA MOTORS
सेन्सेक्स ८०,७१६ ५१ (०.०६%) निफ्टी २४,६१३ २६ (०.११%) मिडकॅप ४७,८२३ -१३७ (०.२९%) स्मॉलकॅप ५४,३०१ १७३ (०.३२%)
४,००८ पैकी २,०२० शेअर्समध्ये वाढ
■ मंगळवारी ४,००८ शेअरमध्ये व्यवहार झाले. यातील २,०२० शेअर्समध्ये
वाढ झाली तर १,८९२ शेअर्स घसरले. २७१ समभागांनी ५२ आठवड्यांचा
उच्चांक तर २३ समभागांनी नीचांक नोंदविला.
बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल वाढून ४५५.२०
लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी कंपन्यांचे एकूण बाजार
भांडवल