कोल्हापूर खंडपीठाला माझा विरोध नाही : विश्वजित कदम

Online Varta
0

विश्वजित कदम : विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार



डॉ. विश्वजित कदम म्हणाले, पुणे हा उल्लेख अनावधानाने झाला असून, सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देऊन मी त्याबद्दलचे स्पष्टीकरण देणार आहे. कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, ही पश्चिम महाराष्ट्राची जनभावना आहे. आपण त्या जनभावनेसोबतच आहोत.

नजीकच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही कोल्हापूर खंडपीठ स्थापन करावे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. खंडपीठासाठीच्या सर्व सुविधा कोल्हापुरात आहेत. मुंबईत जाण्याचा व राहणे, खाण्यापर्यंतच्या खर्चाची पक्षकारांची बचत होणार आहे. ही बाब या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन यावर निर्णयासाठी सक्रिय सहभागी राहीन. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे डॉ. विश्वजित कदम म्हणाले.

विषयावर सभागृहात कामकाज झालेले नाही. कोल्हापूर खंडपीठ प्रयत्नांना खीळ बसू नये, म्हणून आपण सोमवारीच तसे पत्र अध्यक्ष नार्वेकर यांना देणार आहे.

या चळवळीत कार्यरत वकील, पक्षकारांनी लक्ष विचलित न होऊ देता आपले प्रयत्न सुरू ठेवावे. त्यांच्या प्रयत्नांना यश यावे, म्हणून मी निःसंकोचपणाने भूमिका पार पाडण्यात मागे राहणार नाही. माझ्या भूमिकेत कोल्हापूर मागणीला छेद देण्याचा हेतू नव्हता आणि हा विषय प्रलंबित राहावा, अशी आपली भूमिका कधीही नव्हती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top