मुंबई : मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. जे आरक्षण दिले जाईल ते न्यायालयात टिकणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माथाडी नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
![]() |
महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील करण्याचे प्रस्तावित असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून महामंडळाच्या नावात बदल करण्याची अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. पोलिस भरतीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची उत्तम संधी मिळाली. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातून १२ आयएएस, १८ आयपीएस आणि ४८० उमेदवार एमपीएससीमध्ये यशस्वी झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेव पाटील माथाडी कामगारांचे दैवत आहेत. माथाडी कामगार समाजाचा महत्त्वाचा घटक आहे, असा उल्लेख फडणवीस यांनी यावेळी केला.