राज्यात 'महायुती'चीच सत्ता येणार

Online Varta
0

 

 अमित शहा यांचा विश्वास; पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार

कोल्हापूर :  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या 'महायुती'चीच सत्ता येणार आहे. एवढेच नाही, तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वासही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी नैराश्य झटकून कामाला लागावे, असा कानमंत्र शहा यांनी यावेळी दिला. दरम्यान, इचलकरंजीचे ज्येष्ठ नेते आ. प्रकाश आवाडे यांनी पुत्र राहुल आवाडे यांच्यासह यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विधानसभेला पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.




कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना अभिवादन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. सोबत कामगारमंत्री सुरेश खाडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, सुनील कांबळे आदी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top