![]() |
ऊस दरासाठी झालेल्या बैठक मध्ये केवळ विशाल दादा पाटीलच उपस्थित… |
मागिल काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कारखान्यांचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रित केले आहे. या बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दरासाठी विविध प्रकारे आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र दोन कारखाने वगळता कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेसंघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी कडेगावमध्ये झालेल्या बैठकीत बहुसंख्य कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित नव्हते. तसेच जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल दादा पाटील वगळता कोणत्याही कारखान्याचे अध्यक्ष उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच दुःख फक्त वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल दादा पाटील यांनाच आहे का इतर कारखान्यांचे अध्यक्ष यांना नाही का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.शनिवारी होणाऱ्या बैठकीला कारखान्यांचे अध्यक्ष हजर राहणार का, याबाबत संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.