 |
जिल्हा नियोजनाच्या निधीवरून अधिकाऱ्यांचा होणार पंचनामा |
सांगली जिल्हा नियोजनचा निधी मागील वर्षीचा खर्च हा ७२ टक्के होता परंतु २०२३-२४ या आर्थिक वर्षातील ४१६ कोटी ६४ लाखांपैकी फक्त १३ टक्केच निधी खर्च झालेला आहे. तरी हा निधी खर्च होत नसल्यामुळे दि. १० जानेवारीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांचा पालकमंत्री, खासदार आणि आमदारांकडून पंचनामा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सभा लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सभा असण्याची शक्यता आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनमधून ३५९ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी मंजूरझ झाला आहे. या निधीमधील किमान ७२ टक्के निधी खर्च असून रस्त्यांसाठीचा ह्या निधीचा केवळ ३० ते ३५ टक्केच खर्च झाला आहे. ह्या निधीची मुदत ही ३१ मार्च २०२४ मध्ये ह्या आर्थिक वर्षात संपणार आहे. तरीही सुद्धा जवळपास ८० ते ९० कोटी रुपये हा निधी अखर्चित आहेत. जर हा निधी खर्च झाला नाही तर तो शासनाकडे परत जाणार आहे. हा निधी २०२३-२४ आर्थिक वर्षातील अनेक विभागांपर्यंत तो पोहचलाच नाही. ह्यामुळे जिल्हा नियोजनच्या सभेत ह्या निधी खर्चावरून अधिकाऱ्यांचाच पंचनामा होण्याची शक्यता वर्तवली आहे.