वसंतदादा साखर कारखान्यावर महिलांसाठी प्रबोधन कार्यशाळा आयोजित

0

 

वसंतदादा साखर कारखान्यावर महिलांसाठी प्रबोधन कार्यशाळा आयोजित 

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग सांगली च्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखाना क्षेत्रात ऊसतोड कामगार तसेच महिला कामगार यांच्यासाठी सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्यावर प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कारखान्याच्या परिसरात पाल ठोकून राहणाऱ्या कामगारांना कोणकोणत्या समस्या येतात हे जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिलांनी स्वतःच्या हक्का साठी व न्यायासाठी सतर्क राहावे याबाबत प्रबोधन करण्यात आले . महिला व बालविकास योजनांची माहिती दिली .

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबद्दल तसेच उसतोडीच्या कामासाठी संरक्षण याकरिता ही कार्यशाळा राबवण्यात आली महिला व बाल विकास अधिकारी विजयमाला माने -खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top