![]() |
सांगलीत साहित्यिक सय्यद अमीन यांना अभिवादन |
सय्यद अमीन यांची १६ पुस्तके प्रसिद्ध झाली यामध्ये त्यांनी महंमद पैगंबर, महापुरुष छत्रपती शिवाजी, अबला कादंबरी अशी दर्जेदार पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी हिंदू - मुस्लिम ऐक्यासाठी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. तसेच वसंतदादा पाटील,स्वामी रामानंद भारती वि. स. पागे, यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले होते. त्यांनी सांगली - मिरज सिटी बसचा प्रस्ताव महामंडळाकडे त्यांच्या कार्यकाळात सादर करून अंमलात आणला होता.