आटपाडीत पुस्तक वाचण्यासाठी नवा उपक्रम

0


आटपाडीत पुस्तक वाचण्यासाठी नवा उपक्रम 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गावात नव्या पिढीमध्ये पुस्तक वाचन्याची आवड निर्माण व्हावी यासाठी एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला . आटपाडी तालुक्याला समृद्ध आणि नामवंत लेखकाचा वारसा लाभला आहे. पण अलीकडे तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी वाचनापासून दूर चालली आहेत तसेच ते मोबईलच्या चक्रव्यूहात अडकत चालली आहेत त्यामुळे येणाऱ्या पिढीला या पासून वाचवण्यासाठी व त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी 'लेखक आपल्या भेटीला' उपक्रमही सुरू केला आहे.

या अंतर्गत एका लेखकाला आणून मार्गदर्शन केले जाते. हा उपक्रम दर शनिवारी या गावातील शाळेत राबवण्यात येणार असून सर्व शिक्षक, गावकरी आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून वाचनावर चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.त्याचबरोबर आठवड्यातील एक दिवस 'वाचा आणि लिहा, वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून स्वतः साठी व मुलांसाठी पुस्तक विकत घ्या असे मार्गदर्शन करण्यात आले .तसेच ही वाचनाची पेरणी वर्षभर चालणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम राबवला जाणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top